¡Sorpréndeme!

१० वर्षाने IPL मध्ये होणार हे नवे बदल पहा व्हिडिओ | Latest Sport Update | Lokmat Marathi News

2021-09-13 0 Dailymotion

आयपीएलच्या नव्या पर्वाच्या नौबती आता झडू लागल्या आहेत. 2007 साली सुरू झालेली ही लिग आता लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. दहा वर्षांचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर अकराव्या वर्षात ही लिग बर्‍याच प्रमाणात बदललेली असेल. मुख्य म्हणजे याचा टी.व्ही. प्रायोजक बदलला असल्याने दहा वर्षांपासून सोनी चॅनेलवरून दिसणारी ही स्पर्धा आता स्टार स्पोर्टस्वर दिसणार आहे. नव्या वर्षात प्रत्येक फ्रँचाईजी आपल्याकडे जुन्या संघातील जास्तीत जास्त पाच खेळाडू कायम ठेवू शकतो. म्हणजे उपलब्ध खेळाडूंपैकी जास्तीत जास्त 40 खेळाडू आहे त्या संघाकडे राहतील, उर्वरित सर्व खेळाडूंसाठी 27 आणि 28 जानेवारी रोजी महालिलाव होणार आहेेे. त्यामुळे बरेचशे खेळाडू आता वेगळ्या जर्सीत दिसतील. गुरुवारी यासाठी रिटेन प्रक्रिया पार पडली. याबाबत चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्‍न आहेत. म्हणून ही प्रक्रिया कशी पार पाडली जाते ते पाहू.

फ्रँचाईजींचे बजेट वाढविले

आयपीएल फ्रँचाईजींना खेळाडूंच्या खरेदीसाठी खर्च करण्यात येणारी रक्कम 66 कोटींवरून 80 कोटी करण्यात आली आहे. प्रत्येक फ्रँचाईजीला आपल्या जवळील किमान 75 टक्के रक्कम खर्च करावी लागणार आहे. 2018 सालाकरिता खेळाडूंची बेस प्राईस 40 लाख रुपये निश्‍चित करण्यात आली आहे. प्रत्येक फ्रँचाईजी किमान 18 आणि जास्तीत जास्त 25 खेळाडू खरेदी करू शकतो. संघात जास्तीत जास्त 8 परदेशी खेळाडू घेण्यात मुभा आहे.


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews